-
pineapple water every morning: आपल्यापैकी अनेक जणांना अननस मोठ्या प्रमाणात आवडतो. चवीला गोड-आंबट असणारे हे फळ शरीराकरिता मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. (Photo: Freepik)
-
पण, तुम्हाला माहितीये का एक वर्षभर दररोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. (Photo: Freepik)
-
एक वर्षभर रोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारणे, वजन कमी होणे, तसेच तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. (Photo: Freepik)
-
यावर डॉक्टरांनी अभ्यास केला आणि त्यात काय समोर आले आपण जाणून घेऊयात. (Photo: Freepik)
-
महिनाभर दररोज अननसाचे पाणी प्यायल्याने तुमच्या एकूण आरोग्यासाठी उल्लेखनीय फायदे मिळू शकतात. शर्मा म्हणाल्या, “अननस पचन सुधारण्यास मदत करते आणि सूज कमी करते.” शर्मा यांच्या मते, अननस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. (Photo: Freepik)
-
शिवाय, अननसाच्या पाण्यात असलेले ब्रोमेलेन निरोगी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.(Photo: Freepik)
-
याव्यतिरिक्त अननसाच्या पाण्याचे दाहकविरोधी गुणधर्म संपूर्ण शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, सांधेदुखी आणि सूज कमी करतात. (Photo: Freepik)
-
अननसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते.(Photo: Freepik)
-
अननसाचे पाणी प्यायल्याने दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच, थायरॉइड असणाऱ्यांनाही हे फायदेशीर आहे. शिवाय, अननसातील अँटिऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून आणि काही प्रमाणात कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.(Photo: Freepik)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक