-
आपल्या रोजच्या जीवनशैली वर आपले संपूर्ण आरोग्य निरभरीत असतं. आपल्या काही सवयी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी त्रासदायी असू शकतात.
-
जाणून घेऊया अशा सवयींबद्दल ज्यामुळे शरीरात किडनी स्टोन होऊ शकतो.
-
किडनी स्टोनचे चार प्रकार असतात कॅल्शियम ऑक्सलेट, यूरिक ऍसिड, स्ट्रुवाइट आणि सिस्टिन.
-
जर तुम्ही दिवसातून खूप कमी पाण्याचे सेवन करत असाल तर हे तुमच्या किडनीसाठी त्रासदायी ठरू शकतं. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असण्याचा परिणाम तुमच्या किडनीवर होतो म्हणून साधारणपणे रोज ३-४ लीटर पाण्याचे सेवन हे आवश्यक आहे.
-
तुमच्या शरीराला जर व्यायामाची सवय नसेल तर हे अनेक आजारांना निमंत्रण असतं शाररीक व्यायाम हा शरीराला निरोगी ठेवतो. कमीत कमी रोज १० मिनिट चालणे देखील तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
-
शरीराचं वजन अधिक असल्यामुळे शरीरात लठ्ठपणा येतो आणि यामुळे किडनी संबंधी त्रास होतात.
-
जास्त मीठ किंवा साखर असलेले अन्न पदार्थ खाल्याने देखील तुमच्या किडनीला त्रास होतो. जास्त साखर आणि मिट असलेले पदार्थ तुमच्या किडनीवर परिणाम करतात.
-
काही लोकांना हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. अशा लोकांनी जास्त प्रमाणात फ्रक्टोज असलेले पदार्थ टाळावे. असे पदार्थ किडनी स्टोनचा धोका वाढवतात.
-
वारंवार वैद्यकीय औषधांचा अति प्रमाणात सेवन केल्याने आणि जास्त प्रमाणात अँटी-बॉयटिक्स हे शरीरात किडनी स्टोनची शक्यता वाढवते.
-
(सर्व फोटो : फ्रीपीक)
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, “मी त्यांना…”