-
कर्करोग हा एक अतिशय गंभीर आजार असून यापासून स्वतःचा बचाव करणे खूपच गरजेचे आहे.
-
हाडांचा कर्करोग हा अतिशय दुर्मिळ आजार असून शरीरातील इतर भागांमधून हा कर्करोग हाडांमध्ये पसरतो.
-
हाडांच्या कर्करोगाची लक्षणे त्याच्या आकार आणि स्थितीवर अवलंबून असतात.
-
या लक्षणांमध्ये शरीराच्या वेदनेचा समावेश होतो. रात्रीच्या वेळेस ही वेदना वाढते. विशेष म्हणजे ज्या भागात ट्यूमर तयार होत असेल त्याच भागात ही वेदना होत असेल असे नाही.
-
हाडांचा कर्करोग असल्यास सांध्यांना सूज येण्याची समस्या देखील वाढते. परंतु सहसा हे लक्षात येत नाही.
-
विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर ते हाडांमध्ये पसरणाऱ्या कर्करोगामुळे असू शकते.
-
हाडांच्या कर्करोगात हाडे कमकुवत होतात, त्यामुळे अनेकदा हालचाल करण्यात अडचण येते. याशिवाय हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
-
शरीरात कर्करोगाच्या पेशी असल्यास वजन झपाट्याने कमी होते. अशा परिस्थितीत शरीराचे वजन नेहमी तपासत राहणे गरजेचे आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर