-
सण-समारंभाला पदार्थांमध्ये गोडाचा शिरा नाही असे कधीच होत नाही. यंदाच्या गुढी पाडव्यानिमित्त पारंपरिक शिरा करण्याऐवजी अननस घातलेला शिरा बनवून पहा. काय आहे या गोड पदार्थाची रेसिपी खाली पाहा. [Photo credit – Freepik]
-
साहित्य – एक कप अननसाच्या फोडी, एक कप पाणी, अर्धा कप साखर, पाव कप साजूक तूप, अर्धा कप बारीक रवा, केशर, दूध, मीठ[Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम एक पातेले घ्या. त्यामध्ये एक कप पाणी घ्या. पाणी थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर घालून पाणी ढवळत राहावे. आता साखरेच्या तयार होणाऱ्या पाकात बारीक चिरलेल्या अननसाच्या फोडी घालून घ्या. [Photo credit – Freepik]
-
साखरेचा पाक सतत ढवळत राहा. पाक शिजल्यानंतर त्याखालील गॅस बंद करा. आता एका पॅनमध्ये किंवा कढईत पाव कप साजूक तूप घालावे. त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा काही मिनिटांसाठी भाजून घ्यावा.[Photo credit – Freepik]
-
रवा कढईतील सर्व तूप शोषून घेईपर्यंत सतत ढवळत राहा. सर्व तूप रव्याने शोषून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार अननसाच्या फोडींचा पाक ओतून घ्यावा. पाक रव्यामध्ये घातल्यानंतर भराभर सर्व पदार्थ ढवळत राहा.[Photo credit – Freepik]
-
अननसाच्या पाकात रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. आता शिऱ्याला अधिक चव येण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्या. काही मिनिटे शिरा तसाच शिजू द्यावा. मात्र मध्येमध्ये तो ढवळत राहा.[Photo credit – Freepik]
-
आता एका वाटीमध्ये थोड्याश्या दुधात केशराच्या १०-१२ काड्या घालून घ्या. शिरा छान शिजून त्याचा गोळा होऊ लागल्यानंतर, तयार केलेले केशराचे मिश्रण शिऱ्यात घालून घ्या. पुन्हा एकदा शिरा ढवळून घ्या आणि त्यावर काही मिनिटांसाठी झाकण ठेऊन द्या.[Photo credit – Freepik]
-
शिऱ्याला एक वाफ आल्यानंतर, कढईखालील गॅस बंद करून टाका. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen या अकाउंटने या सुंदर अननसाच्या शिऱ्याचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. [Photo credit – Freepik]

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी