-
How to Fix Ceiling Fan Noise: उन्हाळा म्हटलं की प्रंचड उकाडा हा जाणवतोय. उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक छताचा पंखा, एसी, टेबल फॅन किंवा कुलर या साधनाचां पूरेपर वापर करतात. पण प्रत्येक घरात एसी, टेबल फॅन किंवा कुलर असेलच असे नाही, त्यात टक…टक…टक असा छताच्या पंख्याच्या सतत येणारा आवाज फार त्रासदायक वाटतो. (फोटो सौजन्य फ्रिपीक )
-
उकाड्यामुळे पंखा बंदही करता येत नाही आणि टक टक आवाजामुळे चालू देखील ठेवता येत नाही.उन्हाळ्यात उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी लोक २४ तास छताचा पंखा वापरतातत, थंडीच्या काळात मात्र तो बंद असल्याने अनेक वेळा त्यातून आवाज येऊ लागतात. (फोटो सौजन्य फ्रिपीक )
-
अनेकवेळा टक टक टक आवाज करून अखेर पंखा बंद पडतो. ऐन उन्हाळ्यात पंखा बंद पडला तर उकाड्याने प्रंचड चीड चीड होते. काय करावे काही सूचत नाही.
तुमच्या सिलिंग फॅनमधूनही आवाज येत असेल तर काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही क्षणार्धात या आवाजापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. (फोटो सौजन्य फ्रिपीक ) -
पंख्याच्या पाती करा स्वच्छ :
छताच्या पंख्याच्या पातींवर अनेकदा धूळ साचते, ज्यामुळे पंखा चालू असताना आवाज येतो. अशा स्थितीत छताचा पंखा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक ठरते. (फोटो सौजन्य फ्रिपीक ) -
स्वच्छ कापड किंवा क्लिनरच्या मदतीने तुम्ही छताच्या पंख्याच्या पातींवर जमा झालेली धूळ सहज काढू शकता. परंतु, पंखा साफ करण्यापूर्वी, वीज कनेक्शन बंद करण्याची खात्री करा. (फोटो सौजन्य फ्रिपीक )
-
पंख्याचे स्क्रू घट्ट करा:
छताच्या पंख्याच्या पातींला जोडलेले स्क्रू देखील अनेक वेळा सैल होतात. अशा स्थितीत छताचा पंख्याचा आवाज येऊ लागतो, त्यामुळे छताच्या पंख्यामधून आवाज आल्यावर त्याच्या पातीला जोडलेले स्क्रू तपासा आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने सर्व पाती घट्ट करा, जेणेकरून छताच्या पंख्याचा आवाज येणार नाही. हे करताना वीज कनेक्शन बंद करण्याची खात्री करा. ((फोटो सौजन्य – अनप्लॅश ) -
पंख्याची मोटर तपासा:
मोटार खराब झाल्यामुळेही छताचा पंख्याचा आवाज येऊ लागतो. अशावेळी आपण छताच्या पंख्याची मोटर तपासू शकता. दुसरीकडे, मोटारमधून जळण्याचा वास येत असेल, तर समजून जा की छताच्या पंख्याची मोटर खराब झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मेकॅनिकला कॉल करून पंख्यामध्ये दुसरी मोटर बदलून घेऊ शकता. ((फोटो सौजन्य – अनप्लॅश ) -
पंखा तिरका आहे का तपासा:
कधीकधी छतावर लटकलेला पंखा तिरका होतो, ज्यामुळे पंख्याचे वजन एका बाजूला सरकते आणि पंखा चालू होताच तो आवाज करू लागतो. अशावेळी छताचा पंखा बंद करून ताबडतोब सरळ करा, अन्यथा तुमचा पंखा खराब होऊ शकतो. ((फोटो सौजन्य – अनप्लॅश ) -
पंख्यामध्ये तेल सोडा:
काही वेळा छताच्या पंख्यामध्ये लावलेले तेल सुकल्याने पंख्याचा आवाज येतो. अशावेळी पंख्याच्या सर्व भागांमध्ये थोडे तेल टाकावे. याशिवाय कपड्याला तेल लावून ब्लेडवरही चोळा. यामुळे पंख्याचा आवाज लगेच गायब होईल. महिन्यातून एकदा पंख्याला तेल लावणे तुमच्यासाठी चांगले आहे ((फोटो सौजन्य – अनप्लॅश )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”