-
Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. यामध्ये महिलेनं साबणामध्ये सेफ्टी पिन्स लावल्या आहेत. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
आपल्याकडे कितीही आधुनिक कपड्यांचे फॅड असले तरीही साडीला दुसरा पर्याय आतापर्यंत मिळालेला नाही. महिलांना साडी म्हणजे जीव की प्राण. कोणत्याही खास कार्यक्रमाला आजही साडी हीच फॅशन प्राधान्याने केली जाते. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
अनेकदा दिसून येते की, साडीला अधिक पिन्स लावल्या तर साडी खराब होते. कधी कधी साडीचा काठ इतका जाड असतो की सेफ्टी पिन त्यामध्ये जात नाही. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
कधी कधी आपल्या हातालाही ती लागते आणि त्यामुळे दुखापत होते. मात्र आता काळजी करु नका. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
या महिलेचा जुगाड ट्राय केल्यानंतर साडीला सेफ्टी पिन लावण्याचं तुमचं टेन्शन कायमचं जाईल. चला पाहुयात काय आहे जुगाड.. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
गृहिणीनं एक साबणाची वडी घेतली आहे आणि त्यामध्ये सेफ्टी पिन लावत आहे. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
साबणामध्ये सिफ्ट पिन ५ ते ६ वेळा टोचून बाहेर काढायची आहे. यानंतर सेफ्टी पिनचा पुढचा टोकदार भाग गुळगुळीत होतो आणि पिन सहज कितीही जाड साडीचा काठ असला तरी सहज बसते. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )
-
पुरुषांना याचा काही फायदा नाही मात्र महिलांनो हा जुगाड करून पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये याचा फायदा कसा वाटला ते आपली कमेंट करून नक्की सांगा. (फोटो : @simplymarathi31 युट्युब चॅनेल ग्रॅब )

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख