-
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे हे फायद्याचे ठरते. दररोज योगा केल्याने आरोग्याच्या विविध समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. (Photo: Freepik)
-
आजकाल यकृताचे आजार होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्नपचनाची क्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम यकृत करते.(Photo: Freepik)
-
यकृताचे कार्य बिघडले की, त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. यकृताचे आरोग्य चांगले राहावे आणि चुकीच्या आहाराचा कोणताही दुष्परिणाम होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी काही योगासने सुचवली आहेत.(Photo: Freepik)
-
चला तर मग जाणून घेऊ यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणती योगासने करावीत. योग तज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(Photo: Freepik)
-
मंगळुरू विद्यापीठाच्या संशोधनात सहभागींनी ४५ दिवस रोज एक तासाच्या योगानंतर यकृत एन्झाइम पातळीत उल्लेखनीय बदल झाल्याचे अनुभवले. (Photo: Freepik)
-
चार आठवडे योग साधना, निसर्गोपचार व पारंपरिक औषधे यांमुळे यकृताची कार्ये, रक्तदाब व शरीराचे वजन यामध्ये त्यांना सुधारणा दिसून आली.(Photo: Freepik)
-
पश्चिमोत्तानासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाला ‘सीटेड फॉरवर्ड बेंड’, असेही म्हटले जाते. या योगासनाचा नियमित सराव केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास, तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.(Photo: Freepik)
-
मेरू वक्रासन : हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे यकृत, ग्रंथी, स्वादुपिंड व मूत्रपिंड सक्रिय होते. चला तर मग मेरू वक्रासन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.(Photo: Freepik)
-
हे बसून करावयाचे आसन आहे. वक्र म्हणजे वाकडे. हे आसन करताना शरीर वक्र होते. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मानदुखी असलेल्यांनाही या आसनामुळे आराम मिळतो.(Photo: Freepik)

“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”