-
ऑफिसमध्ये मधल्या वेळेस आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची नक्कीच इच्छा होते.मग अशा वेळी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणारे काहीतरी चटपटीत पदार्थ आपण खातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर हे भाजलेले किंवा तळलेले खाद्यपदार्थ खाणे तुमच्या रक्तातील साखरेसाठी सुरक्षित आहेत का? तर यावर चेन्नईचे डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मधुमेही रुग्णांना खाद्यपदार्थांच्या सुरक्षित पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले आहे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
मधुमेहींसाठी तळलेले आणि भाजलेले खाद्यपदार्थ खाणे एक समस्या ठरू शकते. कारण- बहुतेक खाद्यपदार्थ हे व्यवस्थित भाजलेले नसतात. ते मुळात तेलात तळलेले असतात; जे नंतर अधिक प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अनेक भाजलेल्या आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फायबरची कमतरता असते. फायबर रक्तप्रवाहातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी फायबरच महत्त्वाची असते. त्यामुळे पुरेशा फायबरशिवाय हे खाद्यपदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेमध्ये वाढ होऊ शकते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
कार्बोहायड्रेट कन्टेन्ट (सामग्री) : अनेक भाजलेले आणि तळलेले खाद्यपदार्थ जसे की, बटाटा चिप्स यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. हे प्राथमिक पोषक घटक आहेत; जे रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रमाण वाढवतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
फॅट्स आणि मीठ : काही भाजलेल्या आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर आणि फॅट्स (ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स) असतात; जे परिणामी चयापचय क्रिया बिघडवतात आणि मग ती इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या उदभवू शकतात. या दोन्ही गोष्टी मधुमेहींसाठी चिंताजनक आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
यावर उपाय म्हणून जास्त मीठ व मसाले घातलेले आणि पॅकिंगचे खाद्यपदार्थ विकत घेण्यापेक्षा घरी शेंगदाणे भाजून घ्या आणि ते एका बरणीत ठेवा आणि त्याचे सेवन करा.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
सुक्या भाजलेल्या डाळी जसे की, चणे हे तुमच्या शरीरास प्रथिने आणि फायबर दोन्ही प्रदान करतात. त्यामुळे तुम्ही याचे सेवन करू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
ताजी फळे खा. तुम्हाला खूप भूक लागत असेल, तर तुमच्या बॅगेत कायम एक फळ ठेवा. फळांमध्ये फायबर आणि पौष्टिक घटकदेखील असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…