-
उन्हाळ्यात बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणे पसंत करतात. सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबतदेखील सोडा पितात. (Photo: Freepik)
-
परंतु, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारकदेखील आहे. त्यात अनेक प्रकारची रसायने आढळतात, जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात.(Photo: Freepik)
-
दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील होतो. (Photo: Freepik)
-
सोड्यामुळे शरीरात केवळ जळजळच होत नाही, तर त्याचा रोगप्रतिकारशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. त्याव्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोकाही वाढतो. (Photo: Freepik
-
जे लोक जास्त सोडा पितात, त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. कारण सोड्यात आढळणारे फॉस्फरिक अॅसिड शरीरातून कॅल्शियम हळूहळू काढून टाकते.(Photo: Freepik)
-
मुतखडा ही एक अशी सामान्य समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते. या स्टोनचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. शिवाय स्टोन हा एक असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त असू शकतो. (Photo: Freepik
-
झिरो शुगर सोडा प्यायल्यानं याचाही धोका वाढतो. सोडा प्यायल्यानं भूक लागण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढते.(Photo: Freepik)
-
रोज सोडा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रोज सोडा पिणे टाळावे.(Photo: Freepik)
-
सकाळी रिकाम्या पोटी रस पिणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने पोटातील ॲसिडिटीची समस्या वाढू शकते, त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच रस प्यावा. दुपारी रस पिणे फायदेशीर आहे.(Photo: Freepik)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा