-
उन्हाळी सुट्टी म्हणजे शाळकरी मुलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, उन्हाळी सुट्टी म्हंटल्यावर दररोज लहान मुलांना कुठे घेऊन जाणार, त्यांच्याबरोबर कोणते खेळ खेळणार असा प्रश्न अनेक पालकांसमोर उभा राहतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तुम्हाला लहान मुलांची उन्हाळी सुट्टी मजेशीर घालवायची असेल. तर तुम्ही पुढील काही पर्यायांचा उपयोग करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, पावभाजी, पाणीपुरी, चॉकलेट केक आदी अनेक पदार्थ घरीच बनवून द्या आणि त्यांचा दिवस आणखीन खास करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
गावी जाऊन या – तुमच्या मुलांना गावाकडे घेऊन जा व तेथील पर्यटन स्थळे दाखवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोहणे (स्विमिंग) – पोहणे म्हणजे नुसते पाण्यात डुंबणे नव्हे तर ती एक कला आहे. तुमच्या मुलांना आवड असेल तर त्यांना पोहण्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा डान्स, गाणं किंवा चित्रकला शिकण्यासाठी क्लासेसला पाठवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बागकाम – मुलांना बागकाम करण्यास शिकवा. झाडांना पाणी देणं, नवीन झाडे लावायला देणं अशी छोटी-छोटी काम त्यांना करायला द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मुलांना निसर्ग आणि प्राण्यांबद्दल माहिती द्या. त्यांना पुस्तके वाचण्यास सांगा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रात्री जेवणानंतर मुलांबरोबर बँडमिंटन खेळा किंवा चिमुकल्यांकडून संध्याकाळी सायकल चालवण्याचा सराव करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट