-
ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. असे म्हणतात की, शनिदेव जेव्हा एखाद्यावर प्रसन्न होतात, तेव्हा ते त्याला राजा बनवतात.
-
ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता म्हटलं आहे. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनीला एका विशिष्ट राशीत आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षे लागतात.
-
आता शनि लवकरच आपली चाल बदलणार आहे. जून महिन्यात कुंभ राशीत वक्री होणार आहेत.
-
शनीचं उलट्या गतीने होणारे मार्गक्रमण १३९ दिवस काही राशींसाठी खूप लाभदायी ठरु शकते. चला तर जाणून घेऊया भाग्यशाली राशी कोणत्या…
-
मेष राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशीच्या लोकांची व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होऊ शकते. बराच काळ अडकलेला पैसा या काळात परत मिळू शकतो.
-
वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात.
-
वृश्चिक राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम) )

Nikki Haley : निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”