-
यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम आहेत. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते, त्यामुळे तहानही भरपूर लागते. उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात.
-
उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन्ही पदार्थांचे सर्वात जास्त सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक समाविष्ट असतात.
-
पण, उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्यासाठी तुम्ही रोज लस्सी किंवा ताक प्यायल्यास तुमच्या शरीराचे काय परिणाम होईल, याचविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. तृप्ती पाधी यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…
-
डॉ. पाधी यांच्या म्हणण्यानुसार, “उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्यदायी आणि पौष्टिक पेयाचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.”
-
उन्हाळ्यात गोड लस्सी पिण्याची मजा काही औरच असते. लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी ठेवते. लस्सी प्यायल्याने शरीर आतून थंड राहते, तर ताक कमी चरबीयुक्त दुधापासून बनवले जाते, त्यामुळे त्यात फॅट नसते. त्यामुळे ताकही तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
-
शरीर हायड्रेट राहतं: लस्सी आणि ताक हे दोन्ही द्रवपदार्थांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवतील. गरम हवामानात हे विशेषतः महत्त्वाचे आहे.
-
पचनक्रिया सुधारते: या पेयांमधील प्रोबायोटिक सामग्री पचनास मदत करते, गॅस आणि ब्लोटिंगसारख्या समस्या दूर करते. दोन्हीं पेयांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात, जे पोटाचे खराब आरोग्य बरे करून एकूण आतड्याचे आरोग्य सुधारते.
-
निरोगी हृदय: दोन्हीं पेयांंचा नियमित सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, निरोगी हृदयाला चालना मिळते.
-
मजबूत हाडे आणि दात: हाडांमध्ये वेदना होणे आणि तरुण वयात हाडांचे आजार टाळायचे असतील तर या दोन्हीं पेयांचे सेवन जरूर करा. कारण हे कॅल्शियमने समृद्ध आहे, हाडांना त्याचा फायदा होऊ शकतो.
-
प्रतिकारशक्ती वाढते: या दोन्ही पेयांमध्ये भरपूर लॅक्टिक ॲसिड असते, त्याचप्रमाणे त्यात व्हिटॅमिन डी ही भरपूर असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. चयापचय गती वाढवते, ज्यामुळे वजन कमी करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
-
शेवटी डॉ. पाधी म्हणतात, हे लक्षात ठेवा, दोन्ही पेय सुरक्षित असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनात अस्वस्थता किंवा कॅलरी सामग्रीमुळे वजन वाढू शकते. त्यामुळे अतिप्रमाणात सेवन करणे टाळलेलेच बरे.
-
जरी लस्सी आणि ताक हे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असले, तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या. (Photos: freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”