-
ऑफिस असो किंवा घर काम पूर्ण झालं नाही तर प्रत्येकाला ताण हा येतोच. कारण आपण योग्य त्या वेळेत ते काम पूर्ण करत नाही आणि मग ते काम कसं पूर्ण करायचं याचा ताण येऊ लागतो आणि मग चिंता वाटू लागते आणि चिडचिड होऊ लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच कामात दिलेलं टार्गेट पूर्ण होत नाही, पगारवाढ होत नाही, कामाच्या ठिकाणी समस्या आली की योग्य ते सहकार्य मिळत नाही, गैरसमज होतात आदी अनेक करणे तणाव किंवा चिंतेची असू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आपण तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तणाव कमी करण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करून पाहा… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. कामाची सुरुवात करण्याआधी दीर्घ श्वास घ्या. असे केल्याने तुमचे मन शांत राहते आणि तुमच्या शरीरातून तणाव निघून जाण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. कार्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या कामाचा प्राधान्यक्रम न ठरल्यानेसुद्धा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिनक्रम ठरवा एक यादी तयार करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. फक्त तणावाच्या कारणांचा शोधच घेणे आवश्यक नसते. तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व मन आनंदी करणाऱ्या गोष्टींचाही आपण शोध घ्यावा. काम करताना एखादी कविता किंवा लेख वाचा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. कामातील इतर सहकाऱ्यांचा आणि स्वतःचा सकारात्मक विचार करा हे तणाव कमी करण्यास तुमची मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५.बॉडी स्कॅन मेडिटेशन – घरी गेल्यावर बेडवर झोपा आणि डोक्यापासून पायापर्यंत तुमचे शरीर मानसिकदृष्ट्या स्कॅन करा. हे सुद्धा ताव कमी करण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल