-
कारलं म्हंटलं की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण नाक मुरडतो. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. (फोटो : Freepik)
-
कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात.(फोटो : Freepik)
-
कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का? मग ही एक चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर जाणून घेऊयात कशी बनवायची कारल्याची चटणी.
-
यासाठी साहित्य – कारले – ३ (किसून बारीक करुन घेतलेले), तेल – १ टेबलस्पून, जिरं – १ टेबलस्पून, हिंग पावडर – १/४ टेबलस्पून, शेंगदाणे – २ टेबलस्पून (जाडसर भरडून घेतलेले), खोबर – १/२ कप, तीळ – १ टेबलस्पून(फोटो : Freepik)
-
हळद – १/४ टेबलस्पून, लाल मिरची पावडर – १, १/२ टेबलस्पून, साखरेची पावडर – २ टेबलस्पून (साखर हलकेच मिक्सरला लावून त्याची पावडर करावी.), लिंबाचा रस – २ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार, चाट मसाला – १/४ टेबलस्पून(फोटो : Freepik)
-
सर्वप्रथम कारल्याचे लहान तुकडे कापून ते काही काळासाठी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावेत. जेणेकरून कारल्याचा कडूपणा चटणीत उतरणार नाही. त्यानंतर कारल्याच्या लहान तुकड्यांचा किसणीवर किसून किस तयार करुन घ्यावा.(फोटो : Freepik)
-
का पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरं, हिंग, किसून बारीक केलेले कारले घालावे. हे सगळे जिन्नस गरम पॅनमध्ये ८ ते १० मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यावेत. (कारल्यातील पाण्याचा अंश संपूर्ण निघून जाईपर्यंत पॅनमध्ये कारल्याचा किस भाजून घ्यावा.)
-
आता या मिश्रणात जाडसर भरड करुन घेतलेले भाजलेले शेंगदाणे, किसून घेतलेल खोबर, तीळ, हळद, लाल मिरची पावडर, साखरेची पावडर, लिंबाचा रस घालावेत.
-
त्यानंतर सगळ्यांत शेवटी यात चवीनुसार मीठ व चाट मसाला घालावा. चमच्याच्या मदतीने कारल्याची सुकी चटणी व्यवस्थित एकजीव करुन घ्यावी.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल