-
पावसाळा ऋतू सुरु झाला की, बाहेर ढगाळ वातावरण, थंडगार हवा असते. अशातच काही तरी गरमागरम खाण्याची खूप इच्छा होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच पावसाळ्यात अनेकांना लगेच सर्दी होते. अशावेळी घशाला आराम आणि सर्दीवर उपाय म्हणून तुम्ही गाजर, टोमॅटो, बीटपासून एक हेल्दी सूप बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हे पौष्टीक सूप बनवण्यासाठी तुम्हाला दोन गाजर, चार टोमॅटो, एक कांदा, १/४ बीट, बटर, ब्लॅक पेपर, दालचिनी, आलं-लसूण, रॉक सॉल्ट, साखर, तमालपत्र, मक्याचे पीठ इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आता कृतीकडे वळूया… १. सर्वप्रथम टोमॅटो, बीट, गाजर व कांदा हे सर्व चिरून घ्या. नंतर कुकरमध्ये एक चमचा तेल घाला. मग त्यात कांदा घालून, सर्व चिरलेले साहित्य घाला आणि नंतर त्यात पाणी टाकून सात ते दहा मिनिटे मध्यम आचेवर ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. सात ते १० मिनिटांनंतर सर्व भाज्या शिजतील आणि थंड झाल्यावर या भाज्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. त्यानंतर बारीक करून घेतलेले मिश्रण गाळून घ्या. नंतर दुसरे भांडे घ्या त्यात लोणी किंवा तूप घाला. मग त्यात तमालपत्र, दालचिनी टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. नंतर चिरलेले लसणाचे तुकडे, कांदा घाला आणि काही वेळ ढवळा. मग त्यात तयार झालेले मिश्रण टाका आणि त्यामध्ये मक्याचे पीठ घालून, ते मिक्स करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. आता त्यात साखर, मीठ व काळी मिरी टाकून २-३ मिनिटे मंद आचेवर ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. जेव्हा सूप तयार होईल तेव्हा गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचे टोमॅटो, गाजराचे सूप तयार झाले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल