-
प्रवासादरम्यान खायला काय घेऊन जायचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पोळी बरोबर खायला भाजी घेऊन गेलो तर बॅगेत तेल सांडेल याची भीती असते. तर तुम्हाला देखील ही चिंता असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या पदार्थाचे नाव आहे मोकळा झुणका ; जो तुम्ही प्रवासादरम्यान डब्यातून पोळी बरोबर खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता. कारण – हा पदार्थ लवकर खराब होत नाही. . (फोटो सौजन्य: युट्युब / @lovecooking2030
-
चला तर पाहुयात मोकळा झुणक्यासाठी लागणार साहित्य व कृती. (फोटो सौजन्य: @Freepik / युट्युब / @homecook9049)
-
मोकळा झुणका बनवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मोकळा झुणका बनवण्यासाठी तुम्हाला बेसनाचे पीठ, राई, जिरे, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ, तेल, पाणी आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एक कढई घ्या. त्यात चार चमचे तेल घ्या. नंतर राई, जिरं, कडीपत्ता, हिंग, मसाला, हळद, मीठ हे घाला. हे सर्व टाकून झाल्यावर एक छोटा कप पाणी त्यात घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर त्यात बेसनाचे पीठ टाका. या पिठाचा एक गोळा होईपर्यंत पीठ टाकत रहा. गोळा तयार झाला की, त्याच्या बाजूने थोडंसं तेल घालायचं आणि दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवायचं. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर गॅस बंद करा व गार झाल्यानंतर गोळा हाताने फोडा आणि मग पोळी किंवा भाकरी बरोबर खा. (फोटो सौजन्य: युट्युब / @homecook9049 )

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case