-
पॅनीक अटॅक ही अचानक आणि तीव्र तणाव किंवा चिंताची स्थिती आहे, जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे जाणवू शकते. पॅनीक अटॅक खूप त्रासदायी असतात पण बहुतेक लोकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्याबद्दल बोलण्यास देखील टाळतात.
-
पॅनिक अटॅकची काही लक्षणे आणि ते टाळण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दल जाणून घेऊया.
-
पॅनीक अटॅक दरम्यान, श्वासोच्छवास जलद होतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यावेळी असे वाटते की घशात काहीतरी अडकले आहे आणि त्यांना श्वास घेता येत नाही. -
पॅनीक अटॅक दरम्यान, हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे चिंता आणि भीती देखील वाढते. -
पॅनीक अटॅक दरम्यान, शरीराच्या विविध भागांमधून जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि तणाव होतो. यावेळात असे वाटू शकते की त्वचा चिकट किंवा थंड पडत आहे. -
पॅनीक अटॅक दरम्यान, हात आणि पाय थंड आणि सुन्न वाटू शकतात. याशिवाय, काही लोकांना शरीरात मुंग्या येणे जाणवते, ज्यामुळे आणखी अस्वस्थता वाढते.
-
पॅनीक अटॅक दरम्यान, एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे किंवा हलके डोके दुखी जाणवू शकते, ज्यामुळे स्थिरता राखणे कठीण होते. पॅनीक अटॅक दरम्यान रक्तदाबात अचानक बदल झाल्यामुळे हे लक्षण उद्भवू शकते.
-
तुम्हाला पॅनीक अटॅक आल्यास तुम्ही लगेच हलका व्यायाम सुरू करा यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात.
-
ध्यान हा तणाव कमी करण्याचा आणि तुम्हाला आराम देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ध्यान करताना मेंदू स्थिर ठेवल्यास, तुम्ही दैनंदिन क्रियाकलापांमध्येही पॅनीक अटॅक टाळू शकतात.
-
संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी ही पॅनीक अटॅकवर उपचार करण्याची एक अल्पकालीन पद्धत आहे. या थेरपीमध्ये, लोकांना त्यांचे नकारात्मक विचार आणि वर्तन बदलण्यास शिकवले जाते.
-
जर चिंता आणि मानसिक तणावाशी संबंधित लक्षणे तुम्हाला खूप त्रास देत असतील, तर अशा परिस्थितीत तुम्ही तज्ञांकडून औषधे घेऊ शकतात. औषधे पॅनीक अटॅक संबंधित त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”