-
Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. (Photo: Youtube @Puneritadka)
-
एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी पेपरवर कांदा ठेवला आहे का? (Photo: Youtube @Puneritadka)
-
आता तुम्ही म्हणाल कांदा आणि पेपरवर कशाला ? मात्र थांबा पावसाळ्यात याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.(Photo: Youtube @Puneritadka)
-
पावसाळ्याचे आगमन होताच वातावरणात थंडावा निर्माण होतो. उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. या दिवसात कांद्याची भजी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. काहीजण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून साठवून ठेवतात. (Photo: Youtube @Puneritadka)
-
अशावेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर, तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो.अन्यथा कांद्याला बुरशी लागते, ओलाव्यामुळे इतर कांदेही खराब होतात. यासाठीच या गृहिणीने हा हटके जुगाड सांगितला आहे.(Photo: Youtube @Puneritadka)
-
पावसाळ्यामुळे आपण एकत्र कांदे घेऊन ठेवतो मात्र कांदे साठवून ठेवल्यास त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतात. मात्र पेपर वापरल्यास हे कांदे अगदी ६ महिने खराब होणार नाही.(Photo: Youtube @Puneritadka)
-
या पेपरमुळे कांद्याचं संपूर्ण पाणी शोषून घेतलं जातं आणि कांदे सुके राहतात. सगळे कांदे का पेपरवर पसरवले आहेत आणि नंतर पॅक केले आहेत. तुम्हीही पावसाळ्यात एकत्र घेतलेले कांदे अशाप्रकारे साठवून ठेऊ शकता.(Photo: Youtube @Puneritadka)
-
पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल, ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही, आणि दीर्घकाळ चांगले टिकतील.(Photo: Youtube @Puneritadka)
-
@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.(Photo: Youtube @Puneritadka)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”