-
एखादा पुलाव किंवा बिर्याणी बनवली की, त्याच्याबरोबर सॅलड हे हमखास असतं.यात काकडी,गाजर बरोबर बीट सुद्धा आवर्जुन दिले जाते. कारण अनेकांना बीट मनापासून आवडत नाही.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
म्हणून गृहिणी बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी, बीटाचे पराठे इत्यादी बनवतात. तर आज आपण बीटाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत ; जी तुम्ही लहान मुलांच्या डब्यातही देऊ शकता. (फोटो सौजन्य: युट्युब/ @TabuTinkuFoodies)
-
बीटाची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो बीट, दोन कांदा, एक टोमॅटो, जिरं, मोहरी, कडीपत्ता, हळद, मीठ, तिखट मसाला इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाव किलो बीट बाजारातून आणा. त्यानंतर बीट स्वछ धुवून घ्या व साल काढून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर बीट किसून घ्या. दोन कांदे, एक टोमॅटो बारीक चिरून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कढई घ्या. त्यात एक चमचा तेल घाला व त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता घालून परतवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घाला. कांदा, टोमॅटो जरासा लालसर झाला की त्यात तिखट मसाला घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर त्यात हळद, मीठ, किसून घेतलेला बीट घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वाफेवर १० मिनिटे शिजू द्या.अशाप्रकारे तुमची बीटाची पौष्टीक भाजी तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल