-
हळद हा भारतीय घरात वापरला जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीचा वापर स्वयंपाकघरात अन्न तयार करताना केला जातो; पण त्याचबरोबर औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक विवाह समारंभात आणि सौंदर्य उपचारांसाठीही हळदीचा वापर केला जातो.
-
डिजिटल निर्माते डॉ. बर्ग यांच्या मते, “जर तुम्हाला संधिवात, टेंडोनिटिस (Tendonitis) व बर्सायटिस (bursitis) यांसारखे ऑटोइम्युन रोग असतील, तर हळदीचे दाहकविरोधी गुणधर्म त्यावर जादूसारखे काम करतात.
-
हळदीच्या सेवनामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि पायांची सूज कमी होते.” त्याचे परिणाम अनुभवण्यासाठी त्यांनी हा मसाला १४ दिवस खाण्याची शिफारस केली आहे.
-
तुमच्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश केल्यास काय होईल?
तुमच्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश केल्यास काय होईल? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरू येथी नागरभावी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आहारतज्ज्ञ भारती कुमार यांनी सलग दोन आठवडे तुमच्या आहारात हळदीचा समावेश करण्यामुळे आरोग्य फायदे होतील याबाबत सांगितले. -
हळदीच्या सेवनाचे फायदे
हळद ट्रायग्लिसराईडची पातळी (Triglyceride levels) व एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. -
हळदीमध्ये दाहकविरोधी, अँटीऑक्सिडंट्स व अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात; जे जखमेच्या उपचार आणि संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे गुणधर्म संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत.
-
तुम्ही हळदीचे वारंवार सेवन केल्यास आरोग्याला काही धोका संभवतो का?
हळदीचे जास्त सेवन केल्याने अॅलर्जीची प्रतिक्रिया आणि अतिसार यांसारख्या पाचक समस्या होऊ शकतात. -
हळदीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटदेखील लक्षणीय प्रमाणात असते; ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मूतखडा (किडनी स्टोन) तयार होऊ शकतो.
-
कसा केला जातो हळदीचा आहारात वापर
हळद संपूर्ण स्वरूपात वापरली जाऊ शकते किंवा स्वयंपाकात सुलभतेसाठी बारीक पावडर बनवता येते. -
भारतीय स्वयंपाकात हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बहुतेक पाककृतींमध्ये चिमूटभर मसाल्याचा रंग आणि आरोग्यासाठी फायद्यांचा वापर केला जातो.
-
WHO ने शिफारस केल्यानुसार, नियमित आहारात हळदीचे प्रमाण सुमारे २०० मि.ग्रॅ. आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा