-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सप्टेंबर महिन्यामध्ये तीन राजयोग निर्माण होणार आहेत. ज्यात शनी स्वराशी असलेल्या कुंभ राशीतच ‘शश राजयोग’ निर्माण करत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच ग्रहांचा राजकुमार बुध २३ सप्टेंबर रोजी स्वराशी असलेल्या कन्या राशीत ‘भद्र राजयोग’ निर्माण करत आहे आणि धनाचा कारक ग्रह शुक्र ग्रहानेदेखील १८ सप्टेंबर रोजी आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करून ‘मालव्य राजयोग’ निर्माण केला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे तीन मोठे ग्रह योगायोगाने आपल्याच स्वराशी प्रवेश करत असून या तिन्ही राजयोगांचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींवर पडेल. या राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पदप्रतिष्ठा प्राप्त होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारे तीन राजयोग मेष राशीच्य व्यक्तींसाठी अत्संत लाभदायी असतील. या काळात अचानक धनलाभ होईल. तुमच्या नोकरीत पगारवाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी, बुध आणि शुक्र ग्रहांमुळे निर्माण होणारे तीन राजयोगाचा सकारात्मक परिणाम वृषभ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील सप्टेंबर महिन्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राजयोगामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तीन राजयोगांचा शुभ प्रभावाने कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्यात साहस निर्माण होईल, कोणत्याही मदतीशिवाय सर्व कामे करण्याचा प्रयत्न कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा