-
How to sleep well like athletes: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. (Photo: Freepik)
-
काहीवेळा अतिरिक्त कामांमुळे किंवा कार्यक्रमांमुळे पुरेशी झोप घ्यायला मिळत नाही, यामुळे पुढच्या दिवशीही थकवा येतो. मात्र, आता काळजी करू नका; उद्या खूप दमछाक होणार आहे, झोप पूर्ण होणार नाहीये हे तुम्हाला माहिती असेल तर आधीच झोप कशी पूर्ण करायची हे जाणून घ्या.(Photo: Freepik)
-
ऑलिम्पिक खेळाडू वापरत असलेला हा फंडा तुम्हीही एकदा वापरून पाहाच. झोप ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे तुमच्या खेळात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.(Photo: Freepik)
-
“बँकिंग स्लीप” म्हणजेच खेळाडूंना एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधीच्या दिवसांमध्ये जाणूनबुजून अधिक झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्याप्रमाणे तुम्ही भविष्यातील वापरासाठी पैसे वाचवू शकता, त्याचप्रमाणे क्रीडापटू स्पर्धांच्या कालावधीत पुरेशी विश्रांती घेऊ शकत नाहीत, त्या कालावधीसाठी तयारी करण्यासाठी अतिरिक्त तासांची झोप आधीच “बँक” करतात. (Photo: Freepik)
-
ही अतिरिक्त झोप राखीव म्हणून काम करते, त्यामुळे शारीरिक कार्यक्षमता राखते. सामान्य लोकांसाठी ही झोप दीर्घ सहलीच्या आधी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरू शकते.(Photo: Freepik)
-
रात्री किमान १० तासांपर्यंतची झोप खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण फायदे देऊ शकते. विशेषत: बास्केटबॉलसारख्या खेळांमध्ये ज्यांना अचूकता आणि तग धरण्याची आवश्यकता असते. (Photo: Freepik)
-
विस्तारित झोपेमुळे मानसिक तीक्ष्णता वाढते आणि मूड स्थिरता सुधारते, जे उच्चस्तरीय ॲथलेटिक कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण असतात, तर काहींसाठी ७ ते ९ तासांची झोप पुरेशी ठरू शकते.(Photo: Freepik)
-
अगदी शनिवार व रविवारच्या दिवशीही झोपण्याच्या आणि उठण्याच्या नियमित वेळेलाच उठा. हे तुमच्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाचे नियमन करण्यात मदत करते आणि तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.(Photo: Freepik)
-
नियमित शारीरिक हालचाली आणि संतुलित आहार उत्तम झोपेला मदत करतो. झोपेच्या वेळी जास्त जेवण आणि अल्कोहोल टाळा, कारण ते तुमच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात.(Photo: Freepik)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात