-
पाठदुखी, सांधेदुखी हा सामान्यत: वृद्धापकाळाचा आजार मानला जातो. पण, गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही या समस्या दिसून आल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर सोशल मीडियावरील एका पोस्टवर केलेल्या कमेंटनुसार ‘कोबीच्या पानांमध्ये सांधेदुखी कमी करण्याची क्षमता आहे’; तर ही गोष्ट खरी आहे का? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
होलिस्टिक पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांच्या मते, कोबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वं व फायटोन्यूट्रिएंट्स असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेव्हा तुम्ही कोबीची पानं तुमच्या पायांभोवती गुंडाळता तेव्हा त्यातील फायदेशीर संयुगं त्वचेमध्ये शोषली जातात आणि सूज, वेदना कमी करण्यास ती मदत करतात. हा एक साधा, नैसर्गिक उपाय आहे; ज्याचा आजी-आजोबादेखील उपयोग करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मार्केटमधून कोबी आणल्यावर त्याची ताजी पाने निवडा आणि ती स्वच्छ करून घ्या. ती पाने खराब नाही आहेत ना याचीसुद्धा पडताळणी करा. पानांचा रस काढण्यासाठी रोलिंग पिन, लाटणे किंवा हाताच्या साह्याने पाने किंचित कुस्करून व ठेचून घ्या. त्यानंतर तुमच्या पायांच्या किंवा सांध्याच्या दुखणाऱ्या भागावर कोबीची ठेचलेली पाने ठेवा आणि ती कापड किंवा पट्टीने बांधून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चांगल्या परिणामांसाठी पाने सुमारे दोन ते तास किंवा रात्रभर तुम्ही ठेवू शकता. तसेच तुम्ही ही प्रक्रिया दररोज चार ते पाच दिवस किंवा गरजेनुसार पुन्हा पुन्हादेखील करू शकता, असा सल्ला पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सांधेदुखीसाठी काही नैसर्गिक पर्याय जसे की, हळद : हळद ही शक्तिशाली, दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यामुळे आपल्या नियमित आहारात तिचा समावेश नक्की करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आले : आल्याच्या चहाचे सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तेल लावा : वेदना कमी करण्यासाठी निलगिरी, पेपरमिंट व लव्हेंडरसारख्या तेलांनी तुम्ही वेदना होणाऱ्या जागेवर मालिश करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल