-
पिवळे दात केवळ तुमच्या सौंदर्यातच बाधा निर्माण करत नाही तर दात, हिरड्यांशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर पिवळी घाण साचते. तर या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा टूथपेस्ट बदलून पाहतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर असं न करता तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करून दात स्वछ व निरोगी ठेवू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पुढील सहा पदार्थांमुळे दात स्वच्छ, निरोगी ठेवण्यासाठी होईल मदत… (फोटो सौजन्य : @Freepik)
-
दही : दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ते तुमच्या दात, हिरड्यांच्या मजबूतीसाठी आणि आरोग्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पालेभाज्या – पालेभाज्या हे निरोगी जीवन, निरोगी दातांसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. कारण – त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर आणि कॅलरी कमी असतात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सफरचंद – सफरचंद हे फळे गोड असले तरीही त्यामध्ये फायबर, पाण्याचे प्रमाण जास्त असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट हे दातांसाठी एक सुपरफूड आहे. कारण यामध्ये “CBH” नावाचा एक कंपाऊंड असतो. हा कंपाऊंड दातांच्या इनेमलला कडक बनवतो, ज्यामुळे दात किडण्याची शक्यता कमी होते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
ग्रीन, ब्लॅक टी : ग्रीन ॲण्ड ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉल असतात ; जे प्लेक बॅक्टेरियाशी लढतात. हे बॅक्टेरिया वाढू देत नाहीत किंवा आम्ल तयार करू देत नाहीत, जे दातांना हानी पोहोचवते. त्यामुळे ग्रीन आणि ब्लॅक टी प्यायल्याने दातांना सुरक्षित ठेवण्यात मदत होते. (फोटो सौजन्य : @Freepik)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक