-
फ्रिज ही आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाची वस्तु आहे. थंड पाणी आणि बर्फासाठी याचा प्राथमिक उपयोग केला जातो. (Photo : Freepik)
-
याशिवाय अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण मानले जाते. पण तुम्ही ठेवलेला प्रत्येक पदार्थ आपल्यासाठी निरोगी असतो का? याचा तुम्ही कधी विचार केला का? (Photo : Freepik)
-
फ्रिजमध्ये आपण अनेक गोष्टी ठेवतो पण कोणत्या वस्तू ठेवू नये, हे तुम्हाला माहीत आहे का? (Photo : Freepik)
-
कोणतीही खाण्यासंदर्भात वस्तू आणली की आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो पण काही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. (Photo : Freepik)
-
आज आपण फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये ? याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
अर्धवट कापलेला कांदा
बऱ्याच लोकांना सवय असते की अर्धवट कापलेला कांदा फ्रिजमध्ये बाहेर पडतो, त्याचे विषारी गॅसमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे जर तुम्ही कांदा कापला तर लगेच संपून टाका पण फ्रिजमध्ये ठेवू नका म्हणजे इतर गोष्टींना त्याचा वास येणार नाही. (Photo : Freepik) -
मळलेली कणीक
बऱ्याच लोकांना सवय असते की मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवतात आणि दोन तीन दिवस ती कणीक वापरायची पण अशाने तुम्ही शिळं अन्न खाऊन तुमच्या शरीरामध्ये चुकीची संप्रेरके तयार होतात. चुकीचे पाचक स्त्राव तयार होतात. कणीक भिजवून फ्रिजमध्ये कधीही ठेऊ नये. (Photo : Freepik) -
आलं लसूण
आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. अख्ख आलं की लसूण कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण आलं जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले तर त्याला बुरशी येते कारण फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ ओले होतात, दमट होतात. त्यामुळे त्याच्यावर बुरशी येते आणि त्याचे सेवन केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. (Photo : Freepik) -
आलं लसूण, कांदा, मळलेली कणीक या गोष्टी अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नका. आणि फ्रिजमध्ये काहीही ठेवले तरी त्याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका. (Photo : Freepik)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक