-
हिवाळ्याचे आगमन म्हणजे आजारपणाची चाहूल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सर्दी, ताप, खोकला आणि इतर फ्लू सारख्या अनेक आजारांचं प्रमाण हिवाळ्यात वाढलेलं दिसत.
-
याचा कारण म्हणजे आपली कमी झालेली रोग प्रतिकारशक्ती.
-
या आजारांचा सामना करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे ५ उपाय या हिवाळ्यात तंदुरुस्त राहायला नक्की मदत करतील.
-
पाणी पिणे अत्यंत आवश्यक- उन्हाळ्यात प्रचंड तापमान असल्यामुळे भरपूर पाणी प्यायलं जातं, पण तेच हिवाळ्यात पाण्याची अधिक गरज भासत नाही. पण याचा अर्थ पाणी न पिणे हे बरोबर आहे का?
-
तर हे अत्यंत चुकीचं असून यामुळे हैड्रेशनकडे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे या हंगामामध्ये आपल्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असणे अत्यावश्यक आहे.
-
पौष्टिक बियांचा आहार- काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया,अळशी सारख्या बियांमध्ये ओमेगा- ३ असल्यामुळे हा आहार पाळल्यास रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते.
-
मध प्राशन- मधामध्ये प्रतिजैविक गुणधर्मांचा समावेश आहे ज्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या आजारांशी सामना करण्यातही मदत होते.
-
औषधी चहा प्या- आलं, कॅमोमाइल, अश्वगंधा यांसारख्या औषधी पदार्थांचा समावेश चहामध्ये केल्यास शरीराला ऊब येते. यातले अँटिऑक्सिडेंट्स फ्लूशी सामना करण्यास मदत करतात.
-
तुपाचा वापर- हिवाळी आहारात तुपाचा वापर अत्यंत पौष्टिक असतो. चपाती किंवा भातावर तूप घालून खाल्ल्याने शरीराला चांगली ऊब मिळते. तुपामध्ये व्हिटॅमिन ए,डी, ई आणि केचा समावेश असतो.
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट