-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सूर्य १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीत सूर्य नवव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीत सूर्य दुसऱ्या घरात असेल, त्यामुळे हा काळ वृश्चिक राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या सूर्य लग्न भावात असेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या