-
भारतीय जेवणात भेंडीची भाजी आवडीने खाल्ली जाते. भेंडी ही विविध प्रकारे बनवली जाते. पोळीबरोबर ही भाजी तुम्ही लहानपणापासून खात असाल. सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात भेंडी खाऊ नये, असे तुम्ही कधी वाचले किंवा ऐकले का? (Photo : Freepik)
-
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. पौर्णिमा बहुगुणा यांनी भेंडी हे ‘स्लो पॉयझन’ असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच थंड वातावरणात भेंडीवर बुरशी साचते आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यावर कीटकनाशके वापरली जातात, अशी भेंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. (Photo : Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसनी या विषयी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटल येथील मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. वीणा व्ही सांगतात, “हिवाळ्यात भेंडी खाणे वाईट आहे, हे सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा अभ्यास नाही. खरं तर भेंडीमध्ये फायबर, व्हिटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वर्षभर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (Photo : Freepik) -
डॉ. वीणा पुढे सांगतात, “भेंडीच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारखी समस्या उद्भवू शकते, कारण भेंडीमध्ये फ्रॅक्टन्स असतो जो कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे, ज्यामुळे आतड्यांशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना अतिसार, अॅसिडिटी होऊ शकते. भेंडीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.” (Photo : Freepik)
-
पौष्टिक घटक : भेंडीमध्ये फोलेट व्यतिरिक्त व्हिटॅमिन्स ए, सी आणि के या पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, दृष्टी सुधारते आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते. (Photo : Freepik)
-
पचनक्रियेसाठी फायदेशीर : भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. (Photo : Freepik)





