-
हिवाळ्यात गरम चहा आणि भजी म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं.
-
तसेच रात्री गरमागरम कॉफी म्हणजे खरं सुख, असं म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही.
-
पण, आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगलं, चहा की कॉफी याची सविस्तर माहिती घेऊ…
-
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असल्यामुळे शरीरातील शक्ती वाढविण्यास मदत होते. चहा मात्र तलफ भागविण्यापुरतीच उपयोगी आहे.
-
शरीरातील पाणी राखण्यासाठी किंवा हायड्रेशन कायम ठेवण्यासाठी चहा एक उत्तम पर्याय ठरेल. कॉफीमध्ये लघवी वाढविणारे पदार्थ असल्यामुळे शरीरातील पाणी कायम राहण्याची शक्यता कमी असते.
-
चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चहाची मदत होते. तसेच, कॉफीचेही फायदे आहेत; परंतु क्वचित वेळेला चिंतेमध्ये वाढ होऊ शकते. या रोगाला अँक्सिएटी, असेही म्हटले जाते.
-
चहामध्ये विविध प्रकारचे फ्लेवर्स पाहायला मिळतात; पण कॉफीमध्ये हा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत नाही.
-
हर्बल चहा पचनशक्ती सुधारतो आणि त्याचा उपयोग हिवाळ्यात जेव्हा जड जेवणाचे सेवन होते तेव्हा होतो. पण, कॉफीमुळे अशा वेळी अॅसिडिटी किंवा जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.
-
चहा बनवायला सोपा आणि सरळ असतो; परंतु कॉफी बनविण्यास थोडा वेळ लागतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी फडणवीसांची नवीन शक्कल; ८० टक्के मतदान केंद्रांवर…