-
कामात लक्ष केंद्रित व्हावे आणि उत्पादकता व्हावी हेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे ध्येय असते.
-
काम करताना आपले वैयक्तिक आयुष्यही तितकेच महत्त्वाचे आहे हे समजणे गरजेचे आहे.
-
कामात उत्पादकता आणणे आणि लक्ष केंद्रित करणे सोपे करण्यासाठी फोर्ब्सने सुचविलेल्या या ५ टिप्स खालीलप्रमाणे :
-
तक्ता बनविणे- दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तक्ता बनविलेला असणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभराचे वेळापत्रक काय असणार आहे हे ठरविल्यानंतर वेळापत्रकामधील कुठल्या गोष्टी पूर्णत्वाला नेता येत आहेत याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
-
काम आणि आराम- काम आणि आराम यामधील संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. सतत काम करणे शरीरासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कामातील उत्पादकता वाढविण्यासाठी आराम आणि काम यांच्या वेळा ठरविणे आवश्यक आहे.
-
ऊर्जा व्यवस्थापन- काम करण्याची सर्वाधिक शक्ती ज्यावेळी असते, त्यावेळी कठीण कामं करणे फायद्याचे ठरेल.
-
वेळेचे व्यवस्थापन- २४ तास काम करणे शरीरासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे शरीराला विश्रांतीही मिळावी यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. दिवसभरात कुठल्या कामांना किती वेळ द्यायचा हे ठरविल्यामुळे काम वेळेत संपून, वैयक्तिक आयुष्यालाही पुरेसा वेळ देता येईल.
-
कामाच्या वातावरणात बदल- कामाच्या वातावरणात बदल करणे कामातील उत्पादकता वाढविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

Today’s Horoscope: शिव योगामुळे कोणाचा मर्जीप्रमाणे जाईल दिवस तर कोणाची काळजी होईल दूर? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य