-
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल (बुधवार) रोजी साजरी केली जाईल. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते. तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धन, संपत्ती सुख-समृद्धी येते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होतात. या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहसा खरेदी करायला कोणी जात नाही. अशावेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करूनही त्याचे शुभ फळ मिळवू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जर तुम्ही सोने-चांदीदेखील खरेदी करू शकत नसाल, तर तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्या-पितळेची भांडी किंवा देवांच्या मूर्तीदेखील खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांबरोबर असतो. अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख, सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता. यात तुम्ही चांदीची नाणी, चांदीचे दागिने खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दिवशी डाळी, तांदूळ, गहू ही धान्यदेखील खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णेचादेखील आशीर्वाद प्राप्त होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अक्षय्य तृतीयेला तुम्ही मातीची भांडीदेखील खरेदी करू शकता. या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्याने आर्थिक समस्या भासत नाही. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडेदेखील खरेदी करू शकता. शिवाय या दिवशी नवे कपडे परिधान करणेदेखील लाभदायी मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अक्षय्य तृतीयेला तुमचे बजेट खूपच कमी असेल तर फक्त १० रूपयांमध्ये मिळणारी पिवळी मोहरीदेखील तुम्ही खरेदी करू शकता. पिवळी मोहरीमुळे घरात सुख-समृद्धी आकर्षिक होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर