-
पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.आहे. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. (छायाचित्र: रॉयटर्स)
-
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे. (छायाचित्र: एपी)
-
याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात आपण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर कसे दिले हे पाहू शकतो. (छायाचित्र: एपी)
-
भारताने पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी दहशतवादी राहतात त्या ठिकाणी हल्ला केला आहे. “ऑपरेशन सिंदूर” द्वारे भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने ही संयुक्तपणे कारवाई केली. (छायाचित्र: रॉयटर्स)
-
या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. (छायाचित्र: एपी)
-
या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)
-
हे चित्र पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मुझफ्फराबादचे आहे. (छायाचित्र: एपी)
-
हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहराचे फोटो आहे. जिथे अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याच्या माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)
-
भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या प्रगत लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद सारख्या भागात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. (छायाचित्र: एपी)
-
बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद हे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. (छायाचित्र: एपी)
-
हा फोटो मुझफ्फराबाद येथील आहे जिथे हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात अंधार पसरला होता. (छायाचित्र: रॉयटर्स)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL