-
अनियमित आहार, अपूर्ण झोप, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावत आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली करून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. परंतु, त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी लवकर उठल्याने शरीर सुदृढ राहते. तुम्ही लवकर उठून सकाळच्या कोवळ्या उन्हात वॉकला जा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सूर्यप्रकाशातून शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते, ज्यामुळे चयापचयदेखील सुधारते. हे वजन कमी करण्यासदेखील मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊन, तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. हे शरीराला डिटॉक्स करते आणि पचनक्रियादेखील सुधारते. तुम्ही लिंबू किंवा मध घालून कोमट पाणीदेखील पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही सकाळी ३०-४५ मिनिटे हलका व्यायाम किंवा योग करू शकता. तुम्ही योगामध्ये सूर्यनमस्कारदेखील करू शकता. त्यामुळे रक्ताभिसारण वाढण्यासह चयापचयदेखील सुधारते. योगा आणि ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik) -
सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे सकाळी ८ वाजण्यापूर्वी नाश्ता आवर्जून करा. नाश्त्यामध्ये अंडी, ओट्स, फळं, ड्रायफुट्स यांचा समावेश करा. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर मेसेज, रील्स, व्हिडीओ पाहणे टाळा. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाया जातो. त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचा किंवा मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

PBKS vs MI Qualifier 2 Live: मुंबई-पंजाब सामना सुरू होण्यात मोठा व्यत्यय, पंचांनी दिलेल्या वेळेतही सामन्याला सुरूवात नाहीच