-
आजची धावपळीची जीवनशैली, असंतुलित आहार आणि तणावामुळे अनेक आजार आपल्याला ग्रासतात. अशा वेळी योग हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवणारा रामबाण उपाय ठरतो. रोज थोडा वेळ योगासाठी दिला तर वजन नियंत्रणात राहते, पचन सुधारते आणि मानसिक शांतता मिळते. विशेषतः लठ्ठपणावर मात करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो.
-
नौकासन
वजन कमी करायचंय? मग ‘नौकासन’ जरूर करा! या आसनात शरीर बोटीच्या आकारात दिसते. यामुळे पोटावरील चरबी झपाट्याने कमी होते. पाठीचा कणा मजबूत होतो आणि पचनक्रिया सुधारते. यकृत आणि पोटाशी संबंधित त्रासही कमी होतात. -
धनुरासन
धनुरासन म्हणजे शरीर धनुष्याच्या आकारात वाकवणे. हे आसन पोटावर झोपून केले जाते आणि पोट, छाती व पाठीवर याचा थेट परिणाम होतो. हे आसन नियमितपणे केल्यास वजन कमी होते, पाठ मजबूत होते आणि शरीर लवचिक बनते. वजन घटवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आसन आहे. -
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराचा व्यायाम! यामध्ये एकाच वेळेस १२ वेगवेगळे योगासन केले जातात. यामुळे चयापचय क्रिया वेगवान होते, पचन सुधारते आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतात. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यावर हे खूप प्रभावी आहे. दररोज काही सूर्यनमस्कार केल्यास वजन कमी होण्यास मोठी मदत होते. -
त्रिकोणासन
या आसनात शरीर त्रिकोणाच्या आकारात वाकले जाते. त्रिकोणासनामुळे शरीर लवचिक आणि तंदुरुस्त राहते, यामुळे वजन कमी होते आणि तणावही दूर होतो. योग्य पद्धतीने हातापायांची स्थिती ठेवून केल्यास संपूर्ण शरीरावर ताण येतो, जे वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. -
सर्वांगासन
सर्वांगासन करताना शरीराचा आकार पुलासारखा बनतो. हे आसन केल्यामुळे पाठीचा कणा, कंबर आणि पाय मजबूत होतात. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. छाती, मान आणि खांदे यासाठी हे आसन उत्तम आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण नियमित सरावाने सहज जमतं.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”