-
वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या हालचाली मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. कधी कधी त्यांच्या विशेष योगामुळे काही राशींचं नशीब चमकू लागतं.
-
असाच एक अत्यंत शक्तिशाली योग म्हणजे ‘नवपंचम राजयोग’, जो २८ जून २०२५ रोजी तयार होतोय. या दिवशी शनि आणि बुध ग्रह १२० अंशांच्या अंतरावर येऊन राजयोगाची निर्मिती करतील.
-
या योगाचा प्रभाव काही राशींवर विशेष शुभ ठरणार असून, नवीन नोकरी, प्रमोशन, धनलाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
-
शनी आणि बुधदेवाच्या कृपेने पाहुयात कोणत्या राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात.
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरु शकतो. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते तर व्यवसायात नवीन करार आणि नफा मिळू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि अचानक धनलाभ होण्याची संधी निर्माण होईल.
-
तूळ राशीसाठी राजयोग मान-सन्मान आणि लोकप्रियता वाढवणारा ठरु शकतो. शुभ बातम्या, आर्थिक सुधारणा आणि मनातील योजना पूर्ण होण्याचा हा काळ ठरु शकतो. पैसा आणि करिअरच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. राजकारण, सामाजिक कार्यात या राशीची मंडळी आपले वर्चस्व कायम राखू शकतील.
-
कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अडकलेले प्रोजेक्ट्स मार्गी लागतील. या राजयोगामुळे तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मान प्राप्त होऊ शकतो. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भर न्यायालयात हल्ला झाल्यावर सरन्यायाधीश गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…