-
दीर्घायुष्य आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे? हे प्रत्येक व्यक्तीला जाणून घेण्याची इच्छा असते. दीर्घायुष्य जगण्यासाठी निरोगी जीवनशैली, सकस आहार, नियमित व्यायाम या गोष्टी तज्ज्ञांच्या मते महत्वाच्या असतात.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
आता मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथिर मुहम्मद यांनी १०० वर्षांच्या वयात त्यांच्या दीर्घायुष्याबाबत त्यांच्या काही सवयी एका मुलाखतीत बोलताना सांगितल्या आहेत.(फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
मलेशियाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले डॉ. महाथिर मोहम्मद हे नुकतेच (१० जुलै २०२५) १०० वर्षांचे झाले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही सवयी सांगितल्या आहेत. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं : “तुम्हाला निरोगी आणि आनंदी राहायचं असेल तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं महत्वाचं आहे. तुमच्या दिनचर्या ठरवा आणि त्याचं पालन करा”, असं डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं. (फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
मनाचाही व्यायाम आवश्यक : “जर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर केला नाही, तुम्ही गोष्टी विसरायला लागतात. त्यामुळे मी नेहमी वाचतो, मी लिहितो. मी लोकांशी बोलतो. मी व्याख्याने देतो”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
शिस्तप्रिय असावं : “माणसांनी आयुष्यात शिस्तप्रिय असलं पाहिजे. स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
वाईट सवयी टाळा : “धूम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी टाळल्या पाहिजेत. नेहमी संतुलित आणि पोष्टीक आहार घेतला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
सतत नवनवीन गोष्टी शिकलं पाहिजे : “सतत नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. मी अजूनही तरुण पिढ्यांशी संवाद साधत असतो. त्यांचे अनुभव शेअर करतो, असं डॉ. महाथिर मोहम्मद हे सांगतात.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
दोन ओपन-हार्ट सर्जरी, तरीही तंदुरुस्त : डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं की, त्यांना दोन हृदयविकाराचे झटके आले आणि दोन ओपन-हार्ट सर्जरी झाल्या. तरीही पूर्ण जोमाने कामावर परतलो, पण खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिलं, असं त्यांनी सांगितलं. (फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…