-
एकीकडे थंडगार वारा, हिरवागार निसर्ग वारा यांमुळे पावसाळा, तर दुसरीकडे अस्वस्थ वाटणे, थंडगार वातावरणामुळे तहान न लागणे, पोटफुगी आदी समस्या जाणवू लागतात. जर तुम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर तुम्हीच असे एकटे नाही आहात. पावसाळ्यात पोटफुगी होणे जास्त प्रमाणात वाढते. वातावरणाचा दाब कमी होऊन, आर्द्रतेची पातळी वाढते आणि शारीरिक हालचाल कमी होते; ज्यामुळे मानवी शरीरात जास्त पाणी साचून राहते, त्यामुळे पोटफुगी, जडपणा व अस्वस्थता जाणवते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्याबद्दल सेलिब्रिटी डाएटिशियन व वेलनेस कोच सिमरत कथुरिया म्हणतात की, पोटदुखीवर मात करण्यासाठी सोपे उपाय शोधत असाल, तर आपल्याकडे असे असंख्य पदार्थ आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल; ज्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि शरीरात हलकेपणा जाणवण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. काकडी आणि दुधी भोपळा – काकडी आणि दुधी भोपळा शरीरातील सोडियम बाहेर काढून पाणी आणि पोटॅशियम प्रदान करतो, ज्यामुळे शरीरात पाणी जास्त काळ टिकून राहते. सकाळी सर्वांत आधी एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्या किंवा शरीर आतून थंड वाटण्यासाठी, पोटफुगी कमी करण्यासाठी तुमच्या सॅलडमध्ये काकडी घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. आले आणि जिरे – आले पचनास मदत करते. त्यामुळे जळजळ कमी होते. तर, जिरे एंझाइमची क्रिया उत्तेजित करते आणि पोटफुगीच्या समस्येपासून तुम्हाला दूर ठेवते. त्यामुळे दुपार असो किंवा रात्र; जेवणानंतर जिरा पाणी किंवा आल्याचा चहा प्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. केळी – पोटॅशियमयुक्त केळी पोटात पाणी साठवून ठेवण्यास मदत करतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटफुगीची भावना टाळण्यासाठी दररोज एक केळे खा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. दही – पावसाळ्यात पचनक्रियेवर परिणाम होत असल्याने, प्रो-बायोटिक दही आतड्यांतील निरोगी जीवाणूंना मदत करून, त्यांना प्रोत्साहन देते. घरगुती दह्यात सैंधव मीठ, ओवा घालून त्याचे सेवन करा, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. बार्लीचे पाणी – बार्लीचे पाणी पावसाळ्यात एक उत्तम आरोग्यदायी पदार्थ आहे. बार्लीमधले फायबर आतड्यातून अन्न पुढे सरकायला मदत करते. त्यातले उपयुक्त जीवाणू वाढवते. या उपयुक्त बाबी पाहता, पोटाच्या सर्व विकारांवर विशेषत: अतिसार, पोटदुखी यांवर बार्ली उत्तम आहे. बार्ली पाण्यात उकळा, गाळा आणि बाटलीत भरून, ते पाणी दिवसभर प्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
टिप्स…
जास्त मीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा; पोटफुगी वाढण्याचे हे मुख्य कारण आहे.
कार्बोनेटेड पेये टाळा. कारण- त्यामुळे गॅस, पोटफुगी वाढू शकते.
तुमच्या शरीराची सतत हालचाल करीत राहा. स्ट्रेचिंग किंवा थोडासा योगा केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास आणि द्रव पदार्थ टिकून राहण्यास मदत होईल.
पावसाळ्यात पोटफुगी ही सामान्य गोष्ट आहे. पण, ही समस्या बरीसुद्धा होऊ शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य अन्न, सवयींचा पाठपुरावा करावा लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?