-
निरोगी आतड्यांमुळे केवळ पोटाच्या समस्या टाळता येत नाहीत तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. पचनक्रिया चांगली होते आणि तुमचा मूड देखील उत्तम राहतो. परंतु, आनंदी पोटासाठी अन्न महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही जे पिता त्याचा देखील खूप फरक पडतो. health.com च्या अहवालानुसार, पोषणतज्ञ फायबर, दाहक-विरोधी संयुगे (anti-inflammatory compounds) आणि प्रोबायोटिक्सने भरलेली ही सात पेय पिण्याचा सल्ला देतात.
चला तर मग तुमच्या आतड्यांना आराम देणाऱ्या पेयांविषयी जाणून घेऊयात (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा) -
आल्याचा चहा : आल्याचा एक कप गरम चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करेल आणि तुमच्या आतड्यांची हालचाल देखील नियमित करेल. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
Kombucha : हा एक आंबवलेला चहा आहे. यात आतड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करणारे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. (फोटो स्रोत: कॅनव्हा)
-
Prune juice : या ज्यूसमध्ये नैसर्गिकरित्या फायबर आणि सॉर्बिटॉल (एक प्रकारचा कार्बोहायड्रेट जो ग्लुको अल्कोहोल श्रेणीत येतो) जास्त असते. ते बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते आणि पचन सुरळीत ठेवते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
June Tea : मध आणि चहाच्या हिरव्या पानांपासून बनवलेला एक सौम्य प्रकारचा कोम्बुचा संवेदनशील पोटासाठी चांगला मानला जातो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
बीटरूट ज्युस : हा ज्युस आतड्यांमध्ये रक्तप्रवाह वाढवतो. या ज्युसमध्ये भरपूर फायबर व नायट्रेटही असते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
अॅपल सायडर व्हिनेगर ड्रिंक : हे पेय अन्नाचे विघटन करण्यास आणि पोटातील आम्ल संतुलित करण्यास मदत करते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
Turmeric Latte : कर्क्यूमिन (हळदीमध्ये असलेली नारंगी-पिवळ्या रंगाचे क्रिस्टल पावडर) जे आतड्यांमधील जळजळीशी लढण्यास मदत करते आणि नैसर्गिकरित्या पचनास मदत करते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?