-
गॅस आणि पोटफुगीसारख्या पचनाच्या समस्या कधीकधी वेदनादायक ठरतात. यासाठी आहार आणि हायड्रेशन खूप महत्वाचे असले तरी, योग हा दबाव कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेला मदत करण्यासाठी उत्तम उपाय आहे. काही आसनं अशी आहेत जी पोटाच्या अवयवांचे त्रास कमी करतात, त्यावरील ताण कमी करण्यास आणि अडकलेला गॅस अधिक प्रभावीपणे मुक्त करण्यास मदत करतात. हेल्थ डॉट कॉमच्या एका अहवालात योग प्रशिक्षक झायना गोल्ड यांनी १० योगासनं सुचवली आहेत जी तुम्हाला पोटाच्या त्रासांपासून मुक्त करतील. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
अपनासन (गुडघा छातीपर्यंत घेणे) – हे एक सोपे आसन आहे, यामध्ये पोट दाबले जाते आणि अडकलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते. एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलल्याने पचनक्रियेत आणखी मदत होऊ शकते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
सेतू बंधासन – छाती मोकळी करण्यास आणि पचनसंस्था सुरळीत करण्यास मदत करणारं एक सौम्य आसन आहे. या योगासनामुळे पाठीच्या खालच्या भागाला ताकद मिळू शकते आणि पोटाचे स्नायू मजबूत होऊ शकतात. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
एका पायावर बसून स्पाइनल ट्विस्ट करा – हे आसन पोटावर लक्ष केंद्रित करून तुमच्या ताणावर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. हे आसन पोटातील अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारण्यास आणि शरीर स्वच्छ करण्यास मदत करते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
सीटेड हार्ट ओपनर (Seated heart opener) – या योगासनात, घसा, पोट आणि छाती ताणली जाते, जेणेकरून पेटके आणि सूज कमी होतील. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
मार्जरीआसन /बिटिलासन : या आसनामुळे मणका बळकट होतो. तसेच रक्ताभिसरण वाढविण्यास मदत होते. पोटाचा दाब कमी होतो आणि पाठीच्या खालच्या भागाला आराम मिळतो. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
पश्चिमोत्तानासन (पुढे वाकून बसणे) – हे आरामदायी आसन पोट दाबते आणि मज्जासंस्था शांत करते. पचनाच्या अस्वस्थतेशी संबंधित ताण कमी करण्यासाठी हे आदर्श आसन मानले जाते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
बालासन – हे एक विश्रांतीचं योगासन आहे आणि यात पोट हळूवारपणे दाबले जाते. या आसनात स्थिर राहिल्यास पोटात अडकलेला वायू बाहेर पडण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
पाठीचा कणा वळवणे – धड वळवल्याने अंतर्गत अवयवांची मालिश होते आणि आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते. या योगासनामुळे आतड्यांमधील ताण कमी होण्यास आणि पोटफुगी झालेली असल्यास आराम मिळण्यास मदत होते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
अधोमुख श्वानासन – हे आसन पाचक स्नायूंना ताणते. संपूर्ण शरीर ताणल्याने शरीराला ऊर्जा मिळते तसेच पचनक्रिया देखील चांगली होते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)
-
उत्तानासन (पुढे वाकून उभे राहणे) – पुढे वाकणे जे रक्ताभिसरण आणि पोटाच्या अवयवांना उंचावते. हे आसन पाठीवरून तसेच पोटावरून येणारा दाब कमी करण्यास मदत करू शकते. (छायाचित्र स्रोत: कॅनव्हा)

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल