-
टोमॅटो
अनेक जण टोमॅटो फक्त कच्च्या स्वरूपात खातात. मात्र, शिजवलेल्या टोमॅटोमधून शरीराला अधिक लाइकोपीन मिळते. करी, सूप किंवा सॉस यांसारख्या पदार्थांमध्ये टोमॅटो शिजवल्यास हृदय आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असा अँटिऑक्सिडंट हा घटक अधिक प्रमाणात शोषला जातो. -
जवस बिया
जवसाच्या बिया अनेकदा लोक थेट खातात; पण बहुतांश वेळा त्यांचे नीट पचन झाल्यामुळे शरीराला उपयोगी ठरत नाहीत. या बिया बारीक करून खाल्ल्यास, त्यातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर सहज उपलब्ध होते. -
लसूण
कापल्यानंतर किंवा ठेचल्यावर लगेच लसूण शिजवणे चुकीचे ठरते. लसूण चिरून किंवा ठेचून साधारणत: १० मिनिटे ठेवल्यास, त्यातील अॅलिसिन हे महत्त्वाचे संयुग सक्रिय होते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. -
सफरचंद
सफरचंदाची साल काढून खाल्ल्यास, त्यातील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला मिळत नाहीत. सफरचंद नीट धुऊन सालासह खाल्ल्यास क्वेरसेटिनसारखी उपयुक्त द्रव्ये मिळतात आणि त्यामुळे पोषण मूल्य अधिक प्रमाणात मिळते. -
बटाटे
बटाटे सोलून व तळून खाण्याची पद्धत आरोग्यासाठी घातक ठरते. बटाटे सालीसकट उकळल्यास त्यातील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी व फायबर टिकून राहतात आणि अनावश्यक चरबी टाळली जाते. -
तांदूळ
तांदूळ उकळून, त्यातील स्टार्चयुक्त पाणी टाकून दिल्यास बी जीवनसत्त्वे आणि खनिजे वाया जातात. योग्य प्रमाणात पाणी घालून भात शिजवल्यास हे पोषक घटक टिकून राहतात आणि शरीराला ते अधिक फायदेशीर ठरतात.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात