-
हृदयाची कार्यक्षमता आणि मेटाबॉलिझम सुधारण्यापासून मूड आणि झोपेच्या गुणवत्तेत वाढ करण्यापर्यंत, कित्येक गोष्टींसाठी चालणे ही साधी दिनचर्या फायद्याची ठरते. (Photo by amazon.in and wikipedia)
-
हृदयाचे आरोग्य सुधारते : नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. (Photo by amazon.in and wikipedia)
-
वजन नियंत्रणास मदत : दररोज १०,००० पावले चालल्याने सुमारे ३०० ते ५०० कॅलरीज बर्न होऊ शकतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि चरबी कमी होते. (Photo by amazon.in and wikipedia)
-
स्नायू आणि हाडे मजबूत होतात : नियमित चालण्यामुळे लोअर बॉडीची ताकद वाढते, उभे राहण्याची पद्धत (पोश्चर) सुधारते आणि हाडांची घनता वाढते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसपासून (osteoporosis) बचाव होऊ शकतो. (Photo by amazon.in and wikipedia)
-
मानसिक आरोग्य सुधारते : चालण्यामुळे एंडॉर्फिन्स (endorphins) नावाचे ‘फील गुड’ हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते परिणामी आपला मूड सुधारतो. (Photo by amazon.in and wikipedia)
-
शारीरिक क्षमता वाढते: नियमित चालण्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत होते आणि सहनशक्ती सुधारते. (Photo by amazon.in and wikipedia)
-
झोपेची गुणवत्ता आणि ऊर्जा वाढते : नियमित चालल्याने सहनशक्ती वाढते, दिवसभर तुम्ही सक्रिय राहता आणि गाढ, शांत झोप मिळते. (Photo by amazon.in and wikipedia)

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…