-
चालणे आणि धावणे हे दोन्ही उत्तम कार्डिओ प्रकार आहेत, पण ते शरीरावर वेगळ्या प्रकारे परिणाम करतात. तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टांनुसार, जीवनशैलीनुसार आणि आरोग्याच्या गरजांनुसार कोणता प्रकार योग्य आहे हे कसे ठरवायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Photo Source : Unsplash)
-
कॅलरीज बर्न करणे : तुम्ही जेवढा वेळ चालता तेवढाच वेळ धावलात तर दुप्पट कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचं असल्यास चालण्यापेक्षा धावणं उत्तम. (Photo Source : Unsplash)
-
हृदयाचे आरोग्य : दोन्ही प्रकार रक्तदाब कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. अभ्यासानुसार दोन्हींचा दीर्घकालीन फायदा सारखाच असतो.(Photo Source : Unsplash)
-
इजा होण्याचा धोका : चालण्याच्या तुलनेत धावताना पाय मुरगळणे आणि गुडघ्याच्या दुखापतींचा धोका अधिक असतो. तसेच स्नायूंना दुखापत होऊ शकतो. (Photo Source : Unsplash)
-
सांध्यांवरील ताण : चालणे सांध्यांवर सौम्य ताण आणते, त्यामुळे व्यायामाला, कार्डिओला सुरुवात करणाऱ्यांसाठी, वृद्धांसाठी किंवा गुडघ्यात वेदना असणाऱ्यांसाठी हे अधिक उपयुक्त आहे. तरुणांनी धावण्यावर भर दिल्यास उत्तम. (Photo Source : Unsplash)
-
चालण्याची सवय आयुष्यभर चालू ठेवता येते. तसेच चालण्याचे दीर्घकालीन फायदे आहेत. (Photo Source : Unsplash)
-
मानसिक आरोग्य: चालणे कमी तीव्रतेचे आणि शांत करणारे असल्यामुळे तणाव कमी करण्यासाठी ते अधिक प्रभावी ठरू शकते. त्यामुळे तरुण वर्ग वगळता इतर सर्वांसाठीच चालणं उत्तम आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी चालण्याबरोबर धावण्यावर अधिक लक्ष देता येईल. (Photo Source : Unsplash)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा