-
मद्याचा शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयव प्रणालीवर परिणाम होतो. आरोग्य, वैयक्तिक किंवा वैद्यकीय कारणांसाठी मद्यपान सोडले तर त्याचे फायदे काही तासांच्या आत दिसरण्यास सुरू होतात. नेहमी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीने ते बंद केल्यानंतर त्याच्या शरीरात चांगले बदल घडतात आणि प्रदीर्घ काळ दिसून येतात. मद्यपान सोडल्यानंतर नेमके काय बदल होतात त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Photo Source : Unsplash)
-
हायड्रेशन आणि आराम : मद्य हे शरीराला डीहायड्रेट करतं (निर्जलीकरण/शरीरातील पाण्याची पातळी कमी करतं). मद्यपान सोडल्याच्या एका दिवसात शरिराचं हायड्रेशन सुधारतं आणि झोपेचे चक्र सामान्य होऊ लागतं. (Photo Source : Unsplash)
-
नितळ त्वचा : जळजळ कमी होणे आणि हायड्रेशन सुधारण्यासोबत तुमची त्वचा अधिक निरोगी दिसू लागते. प्रदीर्घ काळ मद्यापासून अंतर राखल्यास त्वचा नितळ होते. आठवडाभरानंतर ऊर्जा वाढल्याचं आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढल्याचं दिसून येतं. (Photo Source : Unsplash)
-
रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य सुधारते : मद्यपान सोडल्याने रक्तदाब कमी होतो, हृदयावरचा ताण कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Photo Source : Unsplash)
-
पचन सुधारतं, गॅसचा त्रास कमी होतो : मद्याने पचनव्यवस्था कोलमडते. त्यामुळे मद्यपान सोडल्यामुळे पचनव्यस्था सुरळीत होऊ लागते, पचनशक्ती सुधारते. गॅस आणि पोटफुगीच्या त्रासापासून मुक्ती मिळते. (Photo Source : Unsplash)
-
रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो : मद्यपान बंद केल्याने रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते. परिणामी आजारी पडणं, सतत सर्दी-पडसं होण्यासारखे त्रास बंद होतात. काही कर्करोगांचे (तोंड, घसा, यकृत) धोके कमी होऊ लागतात. (Photo Source : Unsplash)
-
मूड सुधारतो, मानसिक स्थिरता लाभते : मेंदूचा धुसरपणा (ब्रेन फॉग) कमी होतो ज्यमुळे एकाग्रता सुधारते आणि मूड स्थिर होतो कारण न्युरोट्रान्समीटर संतुलित होतात. चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांमध्ये घट होते. (Photo Source : Unsplash)

१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ