-
भारतामध्ये अनेक अभयारण्ये आहेत, जिथे निसर्गाचं सौंदर्य, कमी गर्दी आणि शांततेत वन्यजीवांच्या दुर्मिळ प्रजाती पाहण्याची संधी मिळते. आम्ही तुम्हाला सहा अशा अभयारण्यांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
भद्रा वन्यजीव अभयारण्य, कर्नाटक : पश्चिम घाटात वसलेल्या या अभयारण्यात बिबट्या व वाघ पाहायला मिळतील. येथे एक सुंदर जलाशय आहे जो बोटींगसाठी आदर्श आहे. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, ओडिशा : भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे भारताचं मिनी अमेझॉन म्हणून ओळखलं जातं. येथे अनेक प्रकारच्या मगरी, स्थलांतर करणारे पक्षी, धनदाट जंगल आणि अनेक जंगली प्राणी पाहायला मिळतील. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
दारोजी अभयारण्य, कर्नाटक : वन्यजीव फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी योग्य ठिकाण म्हणून दारोजी अभयारण्याकडे पाहता येईल. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
एटुर्नागारम वन्यजीव अभयारण्य, तेलंगणा : या अभयारण्यात तुम्हाला कमी गर्दी अुभवता येईल. येथे तुम्हाला बिबट्या व हरणाच्या दुर्मिळ प्रजाती पाहयला मिळतील. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
नामदाफा राष्ट्रीय उद्यान, अरुणाचल प्रदेश : भारतातील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक व खूप प्रसिद्ध असलेले हे राष्ट्रीय उद्यान गडद रंगाचा बिबट्या, फुलपाखरे आणि लाल पांडा यासाठी ओळखले जाते. (Photo Source : Photo Wikimedia commons)
-
ताल छापर अभयारण्य, राजस्थान : वन्यजीव प्रेमींचं हे आवडतं ठिकाण मानलं जातं. (Photo Source : Photo Wikimedia commons)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”