-
Shardiya Navratri 2025: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते.
-
उद्यापासून (सोमवार, २२ सप्टेंबर) शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे.
-
उपवासाच्या काळात शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी, नारळपाणी, ताक, लिंबू सरबत किंवा फळांचे रस नियमितपणे प्या.
-
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या थोड्या वेळाने उपवासाचे पदार्थ खा. यामुळे पोट भरलेले राहते आणि अशक्तपणा जाणवत नाही.
-
उपवासाचे पदार्थ बनवताना कमी तेलाचा वापर करा. तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खाणे अधिक चांगले.
-
उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा कमी मिळते, त्यामुळे पुरेशी झोप घेणे आणि आराम करणे आवश्यक आहे.
-
उपवासाच्या काळात अतिशय थकवणारे व्यायाम टाळा. त्याऐवजी हलका व्यायाम किंवा योग करू शकता.
-
जर तुम्हाला अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल, तर लगेच काहीतरी खा. शरीराच्या गरजेकडे दुर्लक्ष करू नका.

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर