-
डॉ. सौरभ सेठी म्हणतात की, व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश हा नैसर्गिक आणि सुरक्षित स्रोत आहे. आपलं शरीर रोज १५ ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
सूर्यप्रकाशामुळे शरीर नैसर्गिक व्हिटॅमिन डी तयार करतं, जे आहारातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीपेक्षा अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
फॅटी फिश, अंडी, मशरूम आणि काही डेअरी उत्पादने यांमध्येही व्हिटॅमिन डी असतं; पण फक्त आहारावर अवलंबून राहून आवश्यक प्रमाण मिळवणं कठीण आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
डॉ. सेठी म्हणतात की, सूर्यप्रकाशातून मिळणारं व्हिटॅमिन डी नैसर्गिक आणि शरीरासाठी सुरक्षित असल्यामुळे त्याला प्राधान्य द्यायला हवे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
सप्लिमेंट्स फक्त त्या लोकांसाठी उपयुक्त आहेत, ज्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता आहे किंवा डॉक्टरांनी त्यांना तसे सुचवले असेल. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
अत्यधिक गोळ्या घेतल्यास शरीरात कॅल्शियमची पातळी वाढून, किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
व्हिटॅमिन डी फक्त हाडांसाठी नाही; ते रोगप्रतिकार शक्ती, मूड सुधारणे, ऊर्जा पातळी टिकवणे यांसाठी आणि शरीरातील अनेक जीनच्या कार्यासाठीही महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
गोळ्या घेण्यापूर्वी रक्त तपासणी करूनच योग्य मात्रेत त्या घेणे सुरक्षित ठरते, असे डॉ. सेठी सांगतात. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)
-
डॉ. सेठी यांचा अंतिम सल्ला सूर्यप्रकाश + संतुलित आहार हे व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग, आणि सप्लिमेंट्स फक्त गरजेप्रमाणे घ्या. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल