-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नुकताच ऑक्टोबर महिना सुरू झाला असून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ३ वाजून ४३ मिनिटांनी बुध तूळ राशीत प्रवेश केला आहे. २४ ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, राशी परिवर्तनासह बुधाचे ऑक्टोबरमध्ये नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. या महिन्यात बुध तीन वेळा नक्षत्र परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यातील पहिले नक्षत्र परिवर्तन स्वाती नक्षत्रात होईल हे गोचर ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी होईल. बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाही १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधाचे स्वाती नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य