-
जयपूरमधील केसन फार्मा कंपनीच्या खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
या पार्श्वभूमीवर केसन कंपनीच्या खोकल्याच्या औषधांचा वापर तत्काळ बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
-
लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत.
-
तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
-
तुम्ही घेत असलेल्या विशिष्ट खोकल्याच्या औषधाच्या बाटलीवर जी मात्रा (Dosage) लिहिलेली आहे, त्याचे पालन करा.
-
२४ तासांत किती वेळा खोकल्याचे औषध घ्यायचे याची जी मर्यादा नमूद केलेली असेल, ती ओलांडू नका.
-
औषधाबरोबर दिलेला माप कपचा वापर करा. स्वयंपाकघरातील चमचा वापरू नका, कारण तो अचूक नसतो.
-
ज्येष्ठ नागरिकांनी खोकला झाल्यावर कोणतेही कफ सिरप घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
जर तुम्हाला मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) किंवा इतर गंभीर आजार असतील किंवा तुम्ही इतर कोणतीही औषधे घेत असाल, तर खोकल्याचे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”