-
प्रत्येक संस्कृतीत आणि समुहांच्या आपापल्या जेवणाच्या विशिष्ट सवयी अथवा शिष्टाचार असतात जे एका देशात सभ्य मानले जातात किंवा स्वीकारार्ह असतात, मात्र इतर देशात किंवा संस्कृतीत त्या सवयी किंवा शिष्टाचार अप्रिय (अस्वीकारार्ह) ठरतात. आज आपण जगभरातील काही रोचक आणि लोकप्रिय डायनिंग टेबल एटिकेट्स (शिष्टाचार) जाणून घेणार आहोत. (Photo Source : Unsplash)
-
जपान : चॉपस्टिक्स ताटात सरळ ठेवू नये कारण ती कृती अंत्यसंस्काराच्या विधींशी संबंधित आहे. तसेच नूडल्स खाताना आवाज करणे (slurping noodles – वरपण्याचा आवाज) म्हणजे नूडल्सची किंवा ते बनवणाऱ्याची प्रशंसा मानली जाते. (Photo Source : Unsplash)
-
फ्रान्स : जेवताना केवळ मनगट व पुढचा पंजा टेबलावर दिसला पाहिजे. कोपर दिसता कामा नये. फ्रान्समध्ये ब्रेड हे कधीच प्लेटमध्ये ठेवले जात नाहीत, ते टेबलक्लॉथवर ठेवले जातात. (Photo Source : Unsplash)
-
भारत : उजव्या हाताने जेवण्याला प्राधान्य दिलं जातं. डाव्या हाताने जेवणं असभ्य मानलं जातं. अनेक डावखुरे भारतीय उजव्या हाताने जेवतात. (Photo Source : Unsplash)
-
इटली : मासे किंवा कोणतेही सीफूड खाताना, पास्ता खाताना अधिक चीज मागू नये. तसं केल्यास ती कृती खाद्यसंस्कृतीच्या परंपरेचा भंग मानली जाते. तसेच कॉफी ही केवळ सकाळी पिता येते, जेवणानंतर कॉफी पिणं चुकीचं मानलं जातं. (Photo Source : Unsplash)
-
मध्यपूर्व आशिया : भारताप्रमाणे नेहमी उजव्या हातानेच जेवण्याचा नियम असतो. डावा हात अस्वच्छ मानला जातो. तो केवळ स्वच्छतेशी संबंधित कामांवेळी प्रधान्याने वापरला जातो. (Photo Source : Unsplash)
-
चीन : चॉपस्टिक व ताटाचा एकमेकांना स्पर्श होऊन आवाज होता कामा नये. केवळ भिक्षा मागणारे टॉपस्टिक ताटावर वाजवून भिक्षा मागतात असा तिथला समज आहे. चॉपस्टिकचा वापर करून कोणालाही इशारा करणं चुकीचं मानलं जातं. (Photo Source : Unsplash)

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…