-
पेरू हे साधं, सर्वसामान्य दिसणारं फळ असलं तरी त्यात आरोग्यदायी गुणांची खाण दडलेली आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि पचन सुधारण्यास हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते.
-
आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळच्या वेळी पेरू खाल्ल्यास शरीरातील पचनसंस्था स्वच्छ राहते. पेरूमधील जास्त तंतुमय घटकांमुळे पोट साफ होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
-
पेरूमध्ये असलेले ‘सॉल्युबल फायबर’ आतड्यांना सैल करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. हे नैसर्गिक रेचक (laxative) म्हणून काम करते आणि पचन संस्थेचे आरोग्य सुधारते.
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू एक वरदान आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त १२ ते २४ दरम्यान असल्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि ती स्थिर राहते.
-
पेरूमध्ये असलेले फायटो न्यूट्रिएंट्स लाइकोपीन आणि फ्लावोनॉइड्स हे कर्करोगाशी लढा देणारे घटक आहेत. हे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
-
संशोधनानुसार, पेरूच्या पानांचा चहा आठ आठवडे नियमित घेतल्यास एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढते.
-
पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटीव्हायरल गुणधर्म आहेत, त्यामुळे घसा खवखवणे, श्वसनाचे विकार, तसेच सौम्य ॲलर्जी यावरही त्याचा उपयोग होतो.
-
एका पूर्ण पेरूमध्ये अंदाजे ३७ कॅलरी, ३ ग्रॅम तंतू, ८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक खनिजे असतात, त्यामुळे हे कमी कॅलरीचे पण पोषक तत्त्वांनी भरलेले फळ आहे.
-
अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा अर्क स्त्रियांच्या मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतो. यामधील मॅंगनीज आणि तांबे शरीरातील हार्मोनल संतुलन राखतात. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार